Stock Market : शेअर बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो इंडेक्स वगळता जवळजवळ सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह 'लाल' रंगात बंद झाले. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ९०.३३ अंकांनी घसरून ८३,३६८.८२ च्या पातळीवर स्थिरावला, तर एनएसई निफ्टी ५० इंडेक्स ७७.७१ अंकांनी कमकुवत होत २५,५१९.९५ च्या पातळीवर बंद झाला.
बाजारावर 'या' फॅक्टर्सचा झाला परिणाम
आशियाई बाजार सहकार्य करत असतानाही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने पैसे काढत असल्याने देशांतर्गत बाजारात नफावसुलीचे वातावरण राहिले. अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे बाजारात थोडी तेजी दिसली. परंतु, देशांतर्गत पीएमआयचे कमकुवत आकडे आल्याने बाजाराचा मूड नरम पडला आणि तेजी निष्प्रभ ठरली. आयटी कंपन्या वगळता इतर क्षेत्रांत घसरण झाली. आयटी कंपन्या मजबूत राहिल्या कारण त्यांचे तिमाही निकाल अपेक्षेनुसार होते आणि अमेरिकेतील आकडेवारी चांगली होती.
आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स
सर्वाधिक वाढलेले शेअर्स
- एशियन पेंट्स : सर्वाधिक ४.७% वाढीसह बंद.
- रिलायन्स इंडस्ट्रीज : १.५७% ने मजबूत.
- महिंद्रा अँड महिंद्रा : १.०५% वाढ.
- अल्ट्राटेक सिमेंट : ०.७७% वाढ.
- टीसीएस : ०.७०% वाढ.
वाचा - सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
सर्वाधिक घसरलेले शेअर्स
- पॉवर ग्रिड : सर्वाधिक ३.१८% घसरण
- इटरनल : २.५१% घसरण.
- बजाज फायनान्स : १.४३% घसरण.
- आयसीआयसीआय बँक : १.२४% घसरण.
- एनटीपीसी : १.२०% घसरण.
